पुणे - शहरामध्ये कोरोनाचे एकूण ९ रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. अमेरिकेहून १ मार्च रोजी पुण्यातील नागरिक परत आला होता. त्याची तपासणी ११ मार्च रोजी करण्यात आली, ती पॉझिटिव्ह आली. त्यामुळे कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ९ वर गेली आहे. दरम्यान, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संत तुकाराम महोत्सव, बँकिंग ऑडिटवरील राष्ट्रीय परिषद तसेच दि. १५ मार्च रोजी होणारे जागतिक ग्राहक दिनाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले .
पुणे शहरातील ज्या भागातून काेराेना रुग्ण आढळले अाहेत त्या रुग्णांचे वास्तव्य असलेल्या घराचे आजूबाजूला जीपीएसच्या मदतीने तीन किलाेमीटर सीमानिश्चिती करून त्यामध्ये घराेघरी जाऊन आराेग्य विभागामार्फत सर्वेक्षण केले जाणार आहे. जे संशयित रुग्ण आढळून येतील त्यांना रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत, तर पाच किलाेमीटरचे परिक्षेत्र बफर झाेन घाेषित करून तेथीलही सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
पुणे ३२५ निगराणीखाली
> २१४ संशयितांची तपासणी
> ५४ जणांवर उपचार सुरू
> २१३ नमुने एनअायबीए प्रयोगशाळेकडे
> १७१ अहवाल प्राप्त
> १६१ निगेटिव्ह रुग्ण
> ९ पॉझिटिव्ह रुग्ण
> ६१४ परदेशातून आलेल्या नागरिकांची तपासणी
बँकिंग ऑडिटवरील राष्ट्रीय परिषद स्थगित
दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या वतीने दि. १४ व १५ मार्च २०२० रोजी आयोजित बँकिंग ऑडिटवरील राष्ट्रीय परिषद पुढे ढकलण्यात आली आहे, असे आयसीएआयच्या पुणे शाखेचे अध्यक्ष सीए अभिषेक धामणे यांनी कळवले आहे.
डॉ.आंबेडकर, शाहू महाराज जन्मशताब्दी सोहळा रद्द
सांगली । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी शाहू महाराजांच्या शताब्दी वर्षानिमित्त हातकणंगले तालुक्यातील माणगावला २१ व २२ मार्चला आयोजित करण्यात आलेला सोहळा रद्द करण्यात आला आहे. कोरोनाच्या भीतीने हा सोहळा रद्द करण्यात आल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. दरम्यान, सांगलीतील नियोजित १०० व्या नाट्यसंमेलनावर कोरोनाचे सावट निर्माण झाले आहे.
संत तुकाराम महोत्सव पुढे ढकलला
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था यांच्या वतीने दि. १३ ते १५ मार्चदरम्यान आयोजित करण्यात आलेला “संत तुकाराम महोत्सव’ कोरोना विषाणू संसर्गाच्या परिस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आला आहे.
प्रा. सदानंद मोरे, संत नामदेव अध्यासनाचे प्रमुख